Dr. Anil Awachat passed away l ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन | Sakal Media

2022-01-27 1

Dr. Anil Awachat passed away l ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन | Sakal Media

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन,सामाजिक कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड.
‘मुक्तांगण’च्या (muktangan) माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी केलेल्या कामामुळे नावाजलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (dr anil awachat) यांचं निधन झालंय. राहत्या घरीच वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिथयश लेखक होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी मोठं काम केलं. अनिल अवचट यांनी साहित्य विश्वासह सांस्कृतिक विषयातही आपली ओळख निर्माण केली होती. पत्रकार (journalist) म्हणून काम करत असतानाही डॉ. अवचट यांनी आपल्या लेखनातून जनजागृती केली.

Videos similaires